शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते आकाश चतुर्वेदी यांनी एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये मोफत अँटीबॉडी तपासणी शिबिराचे आयोजन केले, या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याबाबत तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी व खबरदारीचा उपाय म्हणून आकाश चतुर्वेदी यांनी चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये मोफत अँटीबॉडी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली,
युवा नेते आकाश चतुर्वेदी हे नेहमीच असे विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात त्यांनी या शिबिरा निमित्त नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच मास्क वापरावे सामाजिक अंतर ठेवावे अशाही सूचना नागरिकांना यानिमित्ताने दिल्या, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण ही करून घेण्याबाबत चे आवाहन केले या शिबिरात नगरसेवक शैलेश मोरे व त्यांचे कार्यकर्ते तसेच एम्पायर इस्टेटमधील नागरिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.