शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये तिसऱ्या मजल्यावर नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी महानगरपालिकेतील महापौर व आयुक्त यांचेकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात विक्रम पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध कामे घेऊन शहरातील नागरिक येत असतात. त्यांना त्यांच्या कामासाठी वेळ द्यावा लागतो. या वेळेत नागरिकांना बसण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर बसण्यासाठी व्यवस्था नाही. काही दिवसापूर्वी खुर्ची वगैरे ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता त्या उचलण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक वृद्ध नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांना बसण्यासाठी काहीच व्यवस्था राहिली नाही.
तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्ष नेते, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, पत्रकार कक्ष, सभाग्रह असे कार्यालय आहेत. तसेच गटनेत्यांची कार्यालय ही तिसऱ्या मजल्यावर आहेत. या कार्यालयात वैयक्तिक कामासाठी येणाऱ्या नागरिकांना काही वेळ थांबावे लागते. या वेळेत या नागरिकांना बसण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर व्यवस्था ठेवण्यात आली नाही. तरी महापौर व माननीय आयुक्त यांनी ज्येष्ठ नागरिक व वृद्ध तसेच सामाजिक कार्यकर्ते व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी तिसऱ्या मजल्यावर बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात असेही मागणी केली आहे की, सध्या शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी.