शबनम न्युज / पुणे
महाराष्ट्र शासनाने घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ मार्च २०२१ अखेर नोंदित असलेल्या घरेलू कामगारांना कोव्हिड कालावधीत १५०० रुपयाचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळांमध्ये सन २०११ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत ज्या घरेलू कामगारांनी कामगार उप आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा येथे नोंदणी केलेली आहे. ती नोंदणी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे मॅन्युअल पद्धतीने करण्यात आली होती.
त्या अर्जामध्ये त्यावेळी अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व आयएफएफसी कोड नमुद करण्यात आलेला नव्हता. शासनाने जाहिर केलेल्या आर्थिक सहाय्याचा लाभ नोंदित घरेलू कामगारापर्यंत पोहचविण्याकरीता सुलभता यावी याकरीता शासनाने नोंदित कामगारांची अद्ययावत माहिती व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सन २०११ ते २०१४ या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांनी त्यांची अद्ययावत माहिती व कागदपत्रे मंडळाच्या https://public.mlwb.in/public या लिंक वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरावी असे आवाहन कामगार उपआयुक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क:020 25541617