शबनम न्यूज / पिंपरी
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी राजेंनचेच नाव द्यावे अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना पिंपरी-चिंचवड विधानसभा चे अध्यक्ष संजय ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
संजय ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे कि विमानतळ हे नवीमुंबई च्या हद्दीत जरी असले तरी ते परदेशातुन येणाऱ्या सर्वांसाठी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार च समजले जाईल.दि.बा.पाटिल असोत किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आसोत सर्वांनचे प्रेरणास्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत परदेशातुन येणाऱ्यांना प्रथम महाराष्ट्राचा परिचय करून देण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्वगुणसंपन्न,त्यागाचे प्रतीक, छत्रपती संभाजीराजे यांचे नाव साजेसे आहे.
सदर असंख्य नागरिकांनच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाशी भावना जोडलेल्या आहेत तरी छत्रपती संभाजीराजे यांचे नाव नविन विमानतळाला देण्यात यावे अशी आग्रहाची मागणी छावा क्रांतीवीर सेना पिंपरी-चिंचवड विधानसभे मार्फत करण्यात आली आहे