शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप दादा गायकवाड यांच्या वतीने दापोडी परिसरात ज्या गरीब कुटुंबातील नागरिकांची घरे पावसाळ्यात गळतात, अशा नागरिकांना ताडपत्री चे वाटप करण्यात आले.
दापोडी परिसरातील एकूण शंभर कुटुंबांना ताडपत्री चे वाटप करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना संदीप दादा गायकवाड यांनी सांगितले की, दापोडी परिसरातील या गरीब कुटुंबांचे हाल-अपेष्टा मी नेहमी पाहत असतो. व त्यांना नेहमी मदत करीत असतो. पावसाळ्यामध्ये त्यांची घरे गळतात. घरामध्ये पाणी जमते व त्यांचे अतोनात नुकसान होते. याकरिता पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक मदतीचा हात म्हणून आज मी हे एक उपक्रम राबविले आहे.
नेहमीच गरजवंत यांच्या गरजेला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून दापोडी परिसरात संदीप दादा गायकवाड यांची ओळख निर्माण झाली आहे.