शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड गाव मध्ये कै.शिवाजी उर्फ नाना रामभाऊ भोईर सांस्कृतिक हॉल, केशवनगर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे आयोजन योगदान प्रतिष्ठान मोरया मित्र मंडळ उत्कर्ष हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लब चिंचवड यांच्यावतीने करण्यात आले यावेळी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यावेळी रक्तदात्यां मध्ये उत्साह दिसून येत होता.
सध्या कोरोना काळामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुरेश भोईर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान मुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हटले जाते रक्तदान करून आपण रुग्णसेवा करू शकतो कोरोना संसर्ग मुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी धावपळ करावी लागते त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
सदर शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हभप सुरेश पारखी, रमेश काळे, रवींद्र प्रभुणे, रवीजी देशपांडे, उज्वलाताई गावडे, चैताली भोईर, पोपटराव पवार, विठ्ठल भोईर, हरिभाऊ मोहिते, मचिंद्र खैरणार, गतीराम भोईर, मधुकर बचचे, पाटील डांगे, हभप मधुकर महाराज मोरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, नंदकुमार मुरडे, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
नगरसेवक सुरेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले