शबनम न्युज / मावळ
शेलारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व तळेगांव दाभाडे येथील श्री.डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव सतिश प्रकाश भेगडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.मावळ विधानसभेचे आमदार सुनिलआण्णा शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते सतिश भेगडे यांना सदर निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी दीपक हुलावळे,सौ.अर्चनाताई घारे, कृष्णा दाभोळे,अँड प्रविण झेंडे इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने किमान दोन तास वेळ द्यावा असे आवाहन केले.उत्तम सुत्रसंचालक,मनमिळावू स्वभाव व कुशल संघटक इ.विशेष गुण असणाऱ्या श्री.सतिश भेगडे यांच्या निवडीने शेलारवाडी येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय सतिश भेगडे यांनी व्यक्त केला.