शबनम न्युज / मुंबई
शिव संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख यांना मार्गदर्शन केले आहे.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर शिव संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन प्रत्येक शिवसैनिकाला केले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण आपली पक्षबांधणी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी 12जुलै ते 24 जुलै दरम्यान हे शिव संपर्क अभियान राबवावे, असे शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
प्रत्येक गावागावात, घराघरात शिवसैनिक आहेत. जनतेची सेवा करणे, हे एक शिवसेनेचे व्रत आहे. जनतेच्या मनात जे शिवसेनेचा स्थान आहे. जो विश्वास आहे. तो वाढवा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. शिव संपर्क मोहिमेचा धडाका 12 जुलैपासून सुरू होणार असून 24 जुलैपर्यंत शिवसेनेची पाळेमुळे प्रत्येक गावागावात, घराघरात घट्ट करण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले आहे. स्थानिक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख युवासेना संघटक यांची बैठक घ्यावी, गावागावातील प्रभाग निहाय गावातील शिवसैनिक शाखा, प्रमुख शाखा संघटिका युवा सेना शाखा, संघटक यांची नावे व दूरध्वनी क्रमांक यांची माहिती गोळा करावी.
ज्या गावात शिवसेना शाखा नाही, तेथे शिवसेना शाखा सुरू करा, महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रत्येक भागात सदर बैठका झाल्या पाहिजे व त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती सादर करा, अशाही सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद अधिकाऱ्यांना दिल्या.