शबनम न्यूज / पुणे
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. मधील नैसर्गिक ग्रीन वॉल व्हर्टिकल गार्डन ची सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद झाली
एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक श्री विश्वदीप राय चौधरी यांनी परीक्षण करून किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड मधील या नैसर्गिक ग्रीन वॉल सर्वात मोठी नेचर वॉल म्हणून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व सन्मान पदक देऊन घोषणा केली
सदर ग्रीन वॉल ची लागवड सन 2009 मध्ये केली गेली होती जेव्हा कंपनीचे आवारातून पुणे सोलापूर रोडवरील फ्लायओव्हर ची बांधणी झाली त्या फ्लायोवर च्या पायथ्याशी वाघ नाझी वेल याची रोपे समान लागवड करण्यात आली होती गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीत सदर वेलीने एक विशाल रूप धारण केले 16 हजार स्केअर फुट व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये त्याचे रूपांतर झाले या अथांग अशा व्हर्टिकल ग्रीन वॉल मध्ये विविध प्रकारचे पक्षी ,सरपटणारे प्राणी, आणि फुलपाखरे इत्यादी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे या व्हर्टिकल ग्रीन वॉल मुळे कंपनी परिसरात तापमान कमी होऊन प्रदूषणास आळा बसलेला आहे
सदर वर्टीकल ग्रीन मध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री आदित्य कौशिक कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्री के श्रीनिवासन ,या विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री सदाशिव पाठी, फॅक्टरी मॅनेजर श्री गणेश चौधरी ,कंपनीच्या स्टेट अँड इन्व्हरमेंट विभागाचे अधिकारी श्री प्रकाश कुलकर्णी व श्री मंगेश कुलकर्णी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
या कार्यक्रमावेळी एशिया कप रेकॉर्ड श्री विश्वदीप रॉय चौधरी ,एसपी कॉलेजच्या बॉटनी डिपारमेंट च्या अनुराधा कुलकर्णी , किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी तर्फे श्री अमोल राहुल किर्लोस्कर, सदाशिव पाटील गणेश चौधरी , सचिन मजुमदार, प्रकाश कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सौम्य व युनिक लॅबचे कौशल कुलकर्णी उपस्थित होते , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून अमान राहुल किर्लोस्कर यांनी कंपनीतर्फे सन्मान पदक व प्रमाणपत्र स्विकारले कार्यक्रमाच्या शेवटी गणेश चौधरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले