प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याच्या किटचे वाटप…
शबनम न्यूज /पिंपरी
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक १५ मध्ये ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. त्याद्वारे प्रभागातील रिक्षावाले काका, बस अंकल यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे, विजय शिनकर, सलीम शिकलगार, मनोज देशमुख, नरेंद्र येलकर, राधिका बोर्लीकर, प्रसेन आष्टेकर, समीर जावळकर, आनंद देशमुख, माणिक फडतरे, आर. एस. कुमार, सुदांशु गोरे, पुष्पक जैन, कोरसून आगरवाल, सागर घोरपडे, मुन्ना बेग, अविनाश नवले, केतन जाऊळकर, श्रीवास पाटील, पांडुरंग मोहिते मुकेश सोमय्या, राजेश कडू आदी उपस्थित होते.
अनुप मोरे म्हणाले, कोरोनाचे संकट प्रत्येकावर आलेले आहे. त्या संकटामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहीजण काम नसल्याने घरीच आहेत. गतवर्षी जी स्थिती होती तीही, याच ब्रेक द चैनमध्येसुद्धा झालेली आहे. याचाच फटका बसलेले दररोज शाळेत मुलांना न्यायला येणारे-सोडणारे रिक्षावाले काका, बस अंकल हे लॉकडाऊनच्या काळात काय करत असतील? त्यांचे घर कसे चालत असेल? हा लहानग्या मुलांपुढे पडलेला प्रश्न. लहानग्या व चिमुकल्यांची हीच चिंता हेरून प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा देत, रिक्षावाले काका, बसवाले अंकल यांना अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पालकांनी देखील ही आपली घरातीलच जबाबदारी आहे, असे समजून शक्य ती मदत रिक्षावाले काका व व बस अंकल यांना करावी, असे आवाहनही अनुप मोरे यांनी यावेळी केले.