शबनम न्यूज /पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील मोशी, बोऱ्हाडे वाडी परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्याने या प्रभागातील नगरसेवक वसंत बोराटे यांनी महावितरण विभागाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर १५ दिवसात प्रभागातील विजेचा प्रश्न महावितरण विभागाने सोडविला नाही, वीज पुरवठा पंधरा दिवसात सुरळीत झाला नाही तर, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी प्रसिद्धी पत्रात म्हंटले आहे.
प्रभागात वीज संदर्भात अनेक अडचणी निर्माण होतात.वेळोवेळी वीज खंडित होते. सध्या कोरोना काळात नागरिकांचे वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असतात. परंतु वीज खंडित होत असल्याने ही सर्व कामे थांबतात. अडचणी निर्माण होतात. लॉक डाऊन मुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. आर्थिक अडचण सुरू आहे. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम ही वीज खंडित मुळे अडचणीत येत असल्याने अनेक नागरिक व कुटुंब त्रस्त आहेत. या प्रभागातील विजेचे प्रश्न त्वरित मार्गी लावावे, याकरिता नगरसेवक वसंत बोराटे यांनी महावितरण विभागाला अल्टिमेटम दिला आहे.
पुढील पंधरा दिवसात जर विजेचे प्रश्न तत्परतेने मार्गी लागले नाही तर, मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशाराही नगरसेवक वसंत बोराटे यांनी महावितरण विभागाला दिला आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वसंत बोराटे यांनी म्हटले आहे की , प्रभागातील वीज खंडित मुळे होत असलेल्या त्रासाला व उद्भवणार्या अडचणींचे निवारण महावितरण विभागामार्फत त्वरित झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.