शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या विशेष सहकार्याने व सोशल ऍक्टिव्हिटी महिला फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबासाठी व कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती साठी गुरुवार दिनांक 15 जुलै 2021 पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात येत आहे. या आयुष्यमान भारत कार्ड असलेल्यांना गरजवंत कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या आयुष्यमान भारत कार्ड चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 300 प्रकारच्या सर्जिकल व मेडिकल उपचार तसेच खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा त्याचप्रमाणे 5 लाख रुपये प्रति वर्षी विमा संरक्षण अशा सुविधा मिळणार आहेत.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय देहू आळंदी रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक कुंदन गायकवाड व सोशल अॅक्टिविटी महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा कविता हिंगे यांनी केले आहे.