शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्या 58 वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 103 जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त या वेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सकाळी दहा वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर सभागृहामध्ये योगेश बहल यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्याम लांडे माजी नगरसेवक वसंत शेवडे, बबनराव गाढवे यांच्या सह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेरबहादुर खत्री, किरण सुवर्णा, ज्ञानेश्वर कांबळे, नंदकुमार सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते वीरेंद्र बहल, महेंद्र शर्मा, गोरोबा गुजर, हरप्रीत सिंग, सुशील कुमार घाग यांच्यासह अनेक मान्यवर व योगेश बहल मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कोरोना चे नियम पाळून झालेल्या कार्यक्रमात संत तुकाराम नगर मधील नागरिकांचे शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला ब्ल्यूटूथ हेडफोन सप्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले. उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमाच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 18 जुलै आणि गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी रक्तदान शिबीर आणि रुबी अल्केअर च्या सहकार्याने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभागातील रिक्षाचालकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.