शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ गायक-संगीतकार नाटककार आणि सांस्कृतिक क्षेत्र असणारे कै.वसंतराव जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. वसंतराव जोशी नाट्य संस्थेच्या वतीने चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये एकूण पंधरा जणांनी सहभाग घेतला या एकपात्री अभिनय स्पर्धेत भालचंद्र पुरुषोत्तम भोंडे हे प्रथम क्रमांकाने विजयी झाले तर दानवले संप्रदा या द्वितीय क्रमांकाने विजयी झाले तर तृतीय ज्योती शिंदे विजयी झाले आहेत तसेच बापू केदारी व ज्ञानेश्वर पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्राचार्य राजेंद्र कांकरिया , नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अशोक तनपुरे ,विजय अंबड ,लक्ष्मण शिंदे, प्रमोद कुलकर्णी श्री फाऊंडेशनचे सुशांत पांडे, श्रुती खैरे ,बाळासाहेब भालेराव, प्रिया शिंदे ,योगेश चिंचवड, ऐश्वर्या साटम आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुहास घुमरे, माधव पाटील यांनी काम पाहिले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आढाव यांनी केले तर स्पर्धेचे नियोजन आयोजन कै.वसंतराव जोशी नाट्य संस्थेचे अध्यक्ष मदन जोशी यांनी केले