कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांची मागणी
स्वातंत्र्य सेनानी, व देशाचा अवमान करणाऱ्या कंगना राणावत वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी केली आहे सदर मागणीचे पत्र तक्रार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांना देण्यात आले या पत्रामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे सदर मागणी करण्यात आली आहे दिलेल्या तक्रारीत सुलभा उबाळे यांनी नमूद केले आहे की अभिनेत्री कंगना राणावत हिने एका वृत्त वाहिनी वर मुलाखत देताना मुंबई, देशाची बदनामी करणारे वक्तव्य केले, ‘’भारत १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक म्हणून मिळाले खरे स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळाले’’ असे अत्यंत खालच्या पातळीवरचे, व स्वातंत्र्य सैनिक, देशासाठी शहीद झालेल्या शहीदांचा अवमान केला आहे अशी सतत वादग्रस्त विधाने हि अभिनेत्री करत आहे.
अश्या देशद्रोही अभिनेत्रीवर देशाचा, देशासाठी शहीद झालेल्या शहीदांचा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला म्हणून देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा.