शबनम न्यूज | पिंपरी
चिखली | बातमीदार
बकरी ईद निमित्त प्रभाग क्रमांक एक मधील मुस्लिम बांधवांना घरात ईदचा आनंद कसा निर्माण होईल, यासाठी नगरसेवक व फ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष कुंदन गायकवाड व त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेत आज मिठाईचे वाटप केले यामुळे अनेक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले त्यांचा आनंद यामुळे अधिकच द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
मुस्लिम बांधवाचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान ईद व बकरी ईद . यंदाही बकरी ईद सणावर कोरोनाचे सावट असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी त्याग, बलिदानाची बकरी ईद घरोघरी नमाज पठण करून साधेपणाने साजरी केली.
प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांच्या घरोघरी आज मिठाईचे वाटप केले. अचानकपणे घरात आपल्या नगरसेवकाकडून आलेली ही तिची भेट पाहून प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ईदच्या दिवशी द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
मिठाई वाटप कार्यक्रमासाठी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते संदीप शेलार, भाजपा नेते निगडी चिखली मंडल फिरोजभाई शेख, महेश आवटे, तुषार हजारे,
आशिष रोकडे, सागर जाधव, रवी गाडीलकर, अनिकेत जाधव, दिग्विजय कामठे, लकी नागटिळक यांनी पुढाकार घेतला.
——
प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुख दुःखात मी सहभागी असतो. आज बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे तोंड गोड करावे अशी माझी व माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे आज आम्ही सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना मिठाईचे वाटप केले