शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” सप्ताहाचे उदघाटन पिंपरी युवा सेना युवा वतीने करण्यात आले आहे.
Advertisement
तसेच “माझा मुख्यमंत्री” या उपक्रमाचा आजचा दुसरा दिवस. “माझा मुख्यमंत्री” या सप्ताहांतर्गत ज्या लोकांचे घर पावसाने गळतात, अशा गरीब व होतकरू लोकांना ताडपत्री वाटप शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके व जेष्ठ नागरिक रमेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किसनराव घरबूडवे, अविनाश जाधव, गणेश शिंदे, विजय कदम,गोरख नेटके, महेश बोधले, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.
Advertisement