शबनम न्यूज | मुंबई
काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यात सांगितले होते. याची मुदत आज दुपारी चार पर्यंत होती, त्यानंतर शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यापैकी एक नाव म्हणजेच “नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार’ असे शरद पवार यांच्या पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
हे नाव राज्यसभा निवडणुकीपुरते असल्याचेही आयोगाच्या आदेशात म्हटले आहे. यावेळी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद पवार, नॅशनलिस्ट -काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस अशी तीन नावे शरद पवार गटाने दिली होती. यामधील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार असे नाव निवडणूक आयोगाने पक्षाला जाहीर केले आहे. यानंतर शरद पवार वटवृक्षचिन्हासाठी आग्रही होते, आता कोणते चिन्ह त्यांना देण्यात येतात, हे पाहणे देखील उत्सुकाचे ठरणार आहे.