शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे युवासेना उप शहर अधिकारी राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी विकास नगर, किवळे परिसरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील जी बालके जन्मास येतील त्यांच्या नावे शिवसेनेतर्फे 6161 रुपयांची एफडी करण्यात येईल, असे आवाहन राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी केली आहे. विकास नगर, किवळे गावातील नवजात जन्मलेल्या बालकांचे या पालकांनी बालकाचा जन्माचा पुरावा राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या जनसंपर्क कार्यालयात जमा करावे, असेही आवाहन राजेंद्र तरस यांनी केले आहे.
तसेच शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नगर येथील सर्व रिक्षा चालक, मालक यांना मोफत सीएनजी गॅस पुरवठा करण्यात येणार असल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले आहे. या उपक्रमात सहभाग घेण्याकरीता रिक्षाचालकांनी आपले परमिट आधार कार्ड व मतदान कार्ड राजेंद्र यांच्या जनसंपर्क कार्यालयात जमा करावे, असेही सांगण्यात आले आहे.