शबनम न्यूज | पुणे (दि.०१ डिसेंबर) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काल दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेले दोन प्रवासी हे कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. आता प्रशासन सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे. दरम्यान युवा नेते पार्थ पवार यांनी ही शहरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पार्थ पवार यांनी ट्विट द्वारे आवाहन केले आहे.
दक्षिण आफ्रिकेतून पिंपरी चिंचवडला आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. नव्या विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे अद्याप निश्चित नाही.परंतु,प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.पुन्हा लॉकडाऊन लावणे कोणत्याही स्वरूपात परवडणारे नाही.आर्थिक घडी अजून विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम दूरगामी असेल
— Parth Pawar (@parthajitpawar) December 1, 2021
Advertisement
पार्थ पवार यांनी सांगितले कि, दक्षिण आफ्रिकेतून पिंपरी चिंचवडला आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. नव्या विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे अद्याप निश्चित नाही.परंतु,प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.पुन्हा लॉकडाऊन लावणे कोणत्याही स्वरूपात परवडणारे नाही.आर्थिक घडी अजून विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम दूरगामी असेल.