शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व कोरोना योद्धांचा सन्मान शुक्रवार दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता नगरसेवक तुषार कामठे यांचे जनसंपर्क कार्यालय विनायक नगर पिंपळे निलख येथे संपन्न होणार आहे.
Advertisement
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली आहे.
Advertisement