शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी – चिंचवड उद्योग नगरीतील युवा उद्योजक अर्किमीडी टेक्नोलोजीज चे संस्थापक श्री. प्रदीप मस्तुद यांची फुड अँड ड्रग्स कंन्ज्युमर वेल्फेयर कमिटी महाराष्ट्र या संस्थेवर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – (प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन विभाग) यां पदावर निवड करण्यात आली आहे.
प्रदीप मस्तुद यांचे मागील पुणे जिल्हा अध्यक्षपदावरील व औद्योगिक काम व सामाजिक कामाची कुशलता पाहून या संस्थेने श्री. मस्तुद यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संस्थेत सर्व शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रोफेशनल असलेल्या व्यक्ती काम करत असून या संस्थेचे काम संपूर्ण भारत देशात सुरु आहे.
एफडीसीडब्लूसी हि संस्था अन्न, औषध, सौंदर्य प्रसाधन, दवाखाने, हॉटेल्स, कृषि आणि इतर सेवा उद्योग क्षेत्रात समाज हितार्थ कार्य करत असून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक जागरूकता करण्याचे काम करत आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ. पवन अगरवाल, राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे, राष्ट्रीय सेक्रेटरा श्री. प्रशांत पवार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदाची जबाबदारी श्री. प्रदीप मस्तुद यांना दिली असून, त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने संस्थे अंतर्गत अनेक सामाजिक, आर्थिक व आपल्या भारत देशासाठी भक्कम कार्यक्रम राबवता येतील व आपला समाज / देश कसा सक्षम करता येईल यावर आम्ही व आमच्या संस्थेतील सर्व कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी काम करू व देश सुजलाम सुफलाम बनवू असा विश्वास प्रदीप मस्तुद यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड़ चे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची सदिच्छा भेट घेवून आपल्या संस्थेचे फूड अँड ड्रग्स कन्ज्यूमर वेलफेयर कमिटी चे काम आम्ही सुलभ पद्धतीने करणार असल्याचे पत्र आणि आम्हास मिळालेले नियुक्ति पत्र सादर केले, आपल्या या समाज हित कार्यास आमचे नेहमीच आपनास सहकार्य असेल असे आश्वासन देखील कृष्णप्रकाश साहेबांनी दिले आहे.
सर्व पोलीस डिपार्टमेंट व आरोग्य डिपार्टमेंट या दोन्ही विभागणी कोरोना महामारी मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे स्वतःचे घरदार सोडून 24×7 प्रमाणे ड्युटी केली आहे त्याबद्धल धन्यवाद प्रदीप मस्तुद यांनी धन्यवाद व्यक्त केला.
शिरुर लोकसभेचे खासदारअमोल कोल्हे साहेब, संसदरत्न व मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब, पिंपरी-चिंचवड़ चे पोलीस अधिक्षक कृष्ण प्रकाश साहेब, शिवसेना कार्यालय प्रमुख बशीर सुतार, निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश माने, पिंपरी चिंचवड़ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष प्रसाद कोलते, पिंपरी चिंचवड़ लघु उध्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, चाकण औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे तसेच भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकशंकर आवताडे यांच्याकडुन प्रदीप मस्तुद यांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदावरील निवडीबद्धल अभिनंदन करण्यात आले.