एक महीन्याचे मानधन पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय
शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोकणात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तेथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे अशा नागरिकांना मदत करण्यासाठी प्रियांका प्रवीण बारसे नगरसेविका यांनी गवळीनगर प्रभागातील नागरिकांना आवाहन केले होते की ज्यांना शक्य असेल त्यांनी ते जनसंपर्क कार्यालयात अन्नधान्य कपडे औषध पाणी जीवनावश्यक वस्तू जमा कराव्यात. या आवाहनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सहा कट्टे तांदूळ,एक कट्टा तूरडाळ,500 बिस्किटाचे पुडे, 50 नवीन कपडे तसेच 1000 बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या आमदार महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून कोकणातील पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आमदार दादांच्या जनसंपर्क कार्यालयात ते सुपूर्त केले.
संकट काळात एकमेकांना सहाय्य करण्याचे बाळकडू नगरसेविका प्रियांका बारसे यांना त्यांच्या घरातूनच मिळाले आहे आणि त्यात जनमानसाचा सहकार्याचा – आशीर्वादाचा हात त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळेच समाजात आज त्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
या चांगल्या कामात आदर्श शिक्षण संस्थेतील सहकारी शिक्षक वर्ग तसेच डॉ.सायली बारसे ,प्रभागाध्यक्षा अनुराधा दौंड व महीला कार्यकरीणीचे सहकार्य मिळाले.