शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 17 लाख 65 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 40 हजार 585 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 950 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 902 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 81 हजार 866 रुग्णांपैकी 10 लाख 54 हजार 326 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 358 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.45 टक्के आहे.
हि बातमी पण वाचा : Mumbai : नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 16 हजार 233 रुग्णांपैकी 2 लाख 2 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 403 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 75 हजार 89 रुग्णांपैकी 1 लाख 67 हजार 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 525 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 537 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 72 हजार 651 रुग्णांपैकी 1 लाख 60 हजार 248 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 830 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 746 रुग्णांपैकी 1 लाख 81 हजार 531 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 834 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 540 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 125, सातारा जिल्ह्यात 702, सोलापूर जिल्ह्यात 515, सांगली जिल्ह्यात 751 तर कोल्हापूर जिल्ह्यात 447 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 798 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 170, सातारा जिल्हयामध्ये 862, सोलापूर जिल्हयामध्ये 318, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 87 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 हजार 361 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 26 लाख 18 हजार 895 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 40 हजार 585 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.