शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
आपल्या दैदिप्यमान कौशल्याने,अमूल्य अशा योगदानाने पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढला असून त्याचा
शहराला सार्थ अभिमान वाटत आहे असे गौरवोद्गार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत पद्मश्री गिरीष प्रभुणे,
दंतशल्यचिकित्सक डाॅ.यशवंत इंगळे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिवकुमार लिंबाळे यांचा महापौर माई ढोरे यांच्या
हस्ते स्मृतीचिन्ह शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी महापौर बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,आयुक्त राजेश
पाटील, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, म.न.से.गटनेते सचिन चिखले,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,नगरसचिव
उल्हास जगताप आणि ऑनलाईन नगरसदस्य, नगरसदस्या तसेच अधिकारी उपस्थित होते.
हि बातमी पण वाचा : Pune : पुणे विभागातील 17 लाख 65 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
महापौर माई ढोरे म्हणाल्या शहरात अनेक नामवंत कलावंत, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू,सामाजिक कार्यकर्ते,
गुणवंत कामगार,विद्यार्थी वास्तव करतात.आज सत्कार करण्यात आलेल्या महान विभूतींनी पिंपरी चिंचवड
नगरीमध्ये मानाचा उच्च पुरस्कार मिळवून शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे असे सांगून त्यांनी आपल्या
कारकिर्दीत त्यांचा सन्मान करता आला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाकरीता दिले.शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला.त्यामुळे
त्यांचा कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ.यशवंत इंगळे, जुलै १९९२ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दंतशल्यचिकित्सक या पदावर रुजू झाले
आहेत. त्यांना दंत शास्त्रातील ऑस्कर समजले जाणारे "आउट स्टँडिंग डेंटिस्ट" हा देशपातळीवरील सन्मान प्राप्त
झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच डॉ.यशवंत इंगळे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हजारो चेहऱ्याच्या व
जबड्यांच्या हाडांच्या अनेक उत्तमोत्तम आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. यामध्ये आत्ताच्या घडीला
कोविड पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारामध्ये जबड्याच्या हाडांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या सर्वच रुग्णांच्या
अत्यंत जोखमीच्या आणि कठीण शस्त्र क्रिया केलेल्या आहेत आणि करीत आहेत. राज्यभरातून या प्रकारच्या
शस्त्रक्रियांसाठी रुग्ण आपल्या रुग्णालयात येत आहेत.यामुळे आपल्या महापालिकेचा आणि रुग्णालयाचा लौकिक
वृंद्धीगत झाला आहे. डॉ.इंगळे याना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि ते इंडियन डेंटल अससोसिएशनचे
अध्यक्षही आहेत. त्यांना देशपातळीवरील "आउट स्टँडिंग डेंटिस्ट" हा पुरस्कार नुकताच मिळाला आहे.
तसेच शिवकुमार लिंबाळे यांनी अनेक पुस्तके, कांदब-या ,कथा आणि इतर साहित्य लिहीले आहे. लेखणीतून
प्रतिभासंपन्न साहित्याची निर्मिती केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.