शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे शहराध्यक्ष,नगरसेवक सचिन चिखले यांनी भक्ती – शक्ती उड्डाण पुलाची पाहणी केली. अशी माहिती नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.
भक्ती शक्ती उड्डाण पुलावर गेले महिन्याभरात ३ नागरीकांचा अपघाती मुत्यु झाला आहे. याची दखल घेत पुढे कोणाला ही जिव गमवावा लागु नये, यासाठी, उपायोजना करावी लवकरात लवकर राहीलेले काम पुर्ण करावे, अशी मागणी यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी महापौर व आयुक्त यांच्या कडे केली आहे.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर घुलेताई, पक्षनेता, नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजु मिसाळ , सुमनताई पवळे, सचिन चिखले, उत्तम केदळे, कमल घोलप, अमित गावडे, शर्मिला बाबर, नगरसेविका – शैलेजा मोरे व महानगर पालिकेचे BRTS अधिकारी सवने साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील दोन दिवसांपूर्वी महापौर यांना पाहणी साठी पत्र दिले होते. पुढील कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयी आंदोलन करेल.असे हि सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.