पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२१ :- परकीय सत्तेपासून भारत देश स्वतंत्र झाला त्याचे श्रेय क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतमातेवर अपार प्रेम करणा-या देशभक्तांना आहे अशा भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.
आज ९ ऑगस्ट, क्रांतीदिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या क्रांतीकारकांच्या पुतळ्यास आणि प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे उपस्थित होते
दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य राजू बनसोडे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेडगे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
चिंचवडगाव येथील क्रांतीवीर हुतात्मा दामोदर हरी चापेकर आणि त्यांच्या बंधूच्या समूह शिल्पास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पद्मश्री गिरीश प्रभुणे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख उपस्थित होते.
चिंचवड स्टेशन येथील क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी संजय ससाणे, शिवाजी साळवे, नितीन घोलप, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, भगवान शिंदे, नाना कसबे, मनोज पवार, वसंत वावरे, अरुण जोगदंड, डॉ. धनंजय भिसे, गणेश साठे विशाल कसबे, ऋषीकेश कसबे उपस्थित होते.