शबनम न्युज / मुंबई
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यांच्यासह पोलीस तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Advertisement