शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
मावळ | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संतोष भेगडे यांच्यावतीने गणेश मूर्ती संकलन व विधिवत विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाने नदीपात्रात व तलावांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी बंदी केल्याने आपण हा उपक्रम राबवीत असल्याचे यावेळी संतोष भेगडे यांनी सांगितले तसेच सर्व गणेश भक्तांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी संपर्क साधावे तसेच आपल्या सोसायटी किंवा घराजवळून दिनांक 16 सप्टेंबर रोजी श्रीगणेशमुर्तींचे व निर्माल्य यांचे संकलन करून भक्तीभावाने विधीवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली.
सदर उपक्रम नगरसेवक संतोष भाऊ भेगडे फाउंडेशन वतीने राबविण्यात येणार आहे याकरिता तळेगाव दाभाडे शहरातील विविध ठिकाणी शहरभर गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी वेळ व ठिकाण याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे तरी सर्व गणेश भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असेही आवाहन नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले आहे.