शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी २५ कोटी इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रीकी पध्दतीने करण्याकामी येणा-या १ कोटी २९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ८ मधील रस्त्याचे अर्बन डिझाईन करून सुशोभिकरण करणे आणि विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या ९२ लाख ३७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरएस कॉरिडोरवरील शिंदेवस्ती येथे उड्डाण पुल बांधणीचे कामात अडथळा ठरणारे इएचव्ही पायलॉन शिफ्ट करण्यासाठी येणा-या १४ कोटी ८८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपळे सौदागर येथिल कोकणे चौक ते काटे पाटील चौकापर्यंत उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचे क्षेत्रामध्ये जॉगिंग ट्रॅक वृक्षारोपण (लिनिअर अर्बन गार्डन) उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या ७१ लाख ३३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १० मधील मनपा व दवाखाना इमारतीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या २५ लाख ५० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएमएल यांचे पत्रानुसार सप्टेंबर २०२१ करीता संचलन तूटीकरीता १२ कोटी अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
ह प्रभागातील संत तुकाराम नगर व कासारवाडी टाकी परिसरातील वाल्व्ह ऑपरेशन करण्याकरिता मजुर पुरविण्याकामी येणा-या ५६ लाख ५० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.