शबनम न्युज | अहमदनगर
अहमदनगर | अहमदनगरजिल्हा विशेष प्रतिनिधी. आबासाहेब शिरसाठ.
आज दिनांक 10/08/2021 रोजी ग्रुप ग्रामपंचायत वरखेड येथे श्री लक्ष्मी देवी सार्वजनिक ट्रस्ट वरखेड हे देवस्थान शासकीय होण्याबाबत सर्व ग्रामस्थ वरखेड, माळेवाडी दु. सुरेगाव दही या सर्वांनी मिळून 150 ते 200 नागरिकांच्या सह्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी गावातील गावकरी. शिवाजी वावरे शांताराम कुंढारे, सह कैलास भाऊ कुंढारे यांनी बोलतांना सांगितले की प्रत्येक वर्षा प्रमाणे चैत्र महिन्यामध्ये यात्रा असते लाखो भाविक दर्शनास येत असतात व वर्षा न वर्षे देवस्थान व गाव परीसरात खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते कुठलीही सोई सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे गावकरी व परिसरातील नागरिकांची मागणी नुसार देवस्थान हे शासकीय होण्याबाबत निवेदन देण्यात आले असे कैलास गोपीनाथ कुंढारे यांनी बोलतांना सांगितले, निवेदन घेताना उपस्थित ग्रामसेवक आगळे भाऊसाहेब, सरपंच विनोद ढोकणे पाटील, सामाजिक कार्यकर्ते कैलास गोपीनाथ कुंढारे,शांताराम कुंढारे,शिवाजी वावरे, कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य सचिव सुरेश घनशीराम घुंगासे निवेदन देताना उपस्थित होते.