शबनम न्युज | पुणे
पुणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे तसेच ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप व ओबीसी अध्यक्ष संतोष नागरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले
यावेळी सत्संग मार्गाने किर्तन करून केंद्र सरकारला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली तसेच इंपिरियल डाटा न दिल्यास तीव्र निदर्शने दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर तसेच संसद व आदरणीय पंतप्रधान यांच्या घरासमोर करण्यात येतील असा इशारा यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात आला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्ण शेट्टी, रवींद्र अण्णा माळवतकर प्रदीप देशमुख महेश हांडे आदी मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते