शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील डेंगू व मलेरिया प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, असे मागणीचे निवेदन माजी विरोधीपक्ष नेते पिं चिं मनपा, मच्छिंद्र तात्या तापकीर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, सध्या पावसाचे दिवस सुरु आसल्याने संसर्गजन्य आजाराला शहरात मोठ्या प्रमाणात प्रसार सुरु झाला आहे. शहरात डेंगू व मलेरिया आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे अशा आजाराचा प्रसार रोखणे हि काळाची गरज आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे.ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पती होत आहे.या डासांमुळे शहरात अनेक संसर्गजन्य आजाराला निमंत्रण मिळत आहे. नागरिक घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवत आहेत मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विनाकारण नागरिकाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात ठेकेदारांनी रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. अनेक महिन्यापासून खड्डे आहेत तसेच आहेत. शहरात सर्वच ठीकांनी कामे अगदी कासवगतीने सुरु आहेत त्यामुळे शहरातील कामाला गती देण्यासाठी संबधित विभागाच्या अधिकार्यांना सुचना देण्याची गरज आहे अन्यथा ठेकेदार बदलण्याची गरज आहे. विनाकारण नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. तरी आपणास विनंती आहे कि, आपण लवकरात लवकर डेंगू व मलेरिया यासह संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.असे ही दिलेल्या निवेदनात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हंटले आहे.