शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे पुणे-15 ऑगस्ट म्हणजे काही सुट्टीचा दिवस नाही तर तो भारताच्या इतिहासातला सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे याबद्दल माहिती सांगणारा एक सुंदर लघुपट म्हणजे “आजादी के रंग”. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट 2021 रोजी हा लघुपट जगभरात सर्वत्र युट्युबवर प्रदर्शित झाला आहे .क्रिसेंता प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती केलेल्या या लघुपटाच्या निर्मात्या ,लेखिका व दिग्दर्शिका शोनी विर्दी असून या लघुपटाचे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणजेच सिनेमॅटोग्राफी सुमित येंदे यांनी केले असून लघुपटाचे निवेदन डॉ. अमिष पाठक यांनी केले आहे
.तसेच लघुपटाची वेशभूषा संगिता पाटील यांनी केली आहे तर या लघुपटाचे संगीतकार वी .मिश्रा आहेत .या लघुपटात प्रतिभा सांगळे यांनी भारत मातेची भूमिका साकारली असून विविध कलाकार व बाल कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत .या लघुपटामध्ये श्रीचंद तेजवानी, विनोद छल्लाणी, निरू इसरानी ,ललिता छल्लाणी ,विनू आनंद, लेखा अजित, विशाल चौधरी ,अजय गिरी, बलराज सिंग रोहिणी कोळेकर, धनश्री गायकवाड, झैनाब सय्यद, प्रतिभा सांगळे, तनिषा जोगळेकर ,शौर्या सिंग, तनिषा गोंडचार , ब्रियांना फर्नांडिस, बालकलाकार आशिष गिरी, बालकलाकार प्रणव हरजानी, अजित तुतिका या कलाकारांनी या लघुपटात अभिनय साकारला आहे.
या लघुपटात सिनेमॅटोग्राफीचे सहाय्यक म्हणून सहाय्यक सिनेमॅटोग्राफर ज्ञानेश्वर दहिवाल तर डीजी 6सेन्स स्टुडिओ ने ध्वनी व संगीत दिले आहे .यासाठीचा प्रीमियर शो कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीमुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यातील सोपान बाग येथे करण्यात आला होता. लघुपटाद्वारे दिग्दर्शिका शोनी विर्दी यांनी भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करा व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचा विसर पडता कामा नये असा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. सध्याची तरुण पिढी ही फक्त पार्टी व मनोरंजन यामध्ये अडकले असून या लघुपटाद्वारे देशप्रेम जागृत करण्याचा एक प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. देश प्रेमाविषयी भावना जागृत करण्यासाठी व स्वातंत्र्यदिनानिमित्त या लघुपटाचे लॉन्चिंग झाले. प्रेक्षकांनी असा हा सुंदर लघुपट नक्कीच एकदा पाहण्यास हरकत नाही.