महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते देण्यात आले संगणक
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड। प्रतिनिधी
Advertisement
चिंचवड विधानसभेचे आमदार तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून संगणक व प्रिंटर नवी सांगवी पोलीस चौकी येथे सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
Advertisement
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सदर संगणक सेट देण्यात आले. सदरचे संगणक हे नवी सांगवी पोलीस चौकी मधील पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, नवी सांगवी पोलीस चौकी साठी देण्यात आले आहे. यावेळी पोलीस चौकीतील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या परिसरातील नगरसेवक व भाजप पदाधिकारी तसेच आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement