शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची आज सभा होती परंतु स्थायी समितीचे सदस्य संख्या कमी असल्याने स्थायी समितीची सभा आज तहकूब करण्यात आली.
मागील आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने स्थायी समिती सभापती व त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती सभापतींना तात्पुरता जामीन मिळाला असला तरी चारही कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आज स्थायी समिती सभा बोलावली होती परंतु स्थायी समितीचे सदस्य सभेत अनुपस्थित असल्याने आज स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.
राष्ट्रवादी व शिवसेना वतीने तीव्र आंदोलन केल्याने आज सभा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु स्थायी समिती मधील सदस्य संख्या पूर्ण नसल्याने आज सभा झालीच नाही.
आज स्थायी समितीच्या सभेला नगरसेवक अभिषेक बारणे हे उपस्थित होते परंतु कोणतेही समिती सदस्य हजर नसल्याने सभा तहकूब करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली