शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभाग व माध्यमिक विद्यालय थेरगाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव च्या मैदानावर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस “क्रीडा दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या क्रीडा दिनाच्या कार्यक्रमास स्पोर्ट इंडि युट्युब आणि फेसबुक न्युज चॅनलच्या संचालिका तथा बडवे आणि बडवे इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सुषमा शिंदे,(सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महापालिका ) रज्जाक पानसरे (,क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका), दत्ता झिंजुर्डे( आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, ) अनिता केदारी (क्रीडा पर्यवेक्षिका, ) अनिल मगर( क्रीडा पर्यवेक्षक )हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चंद्रशेखर कदम मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, रामेश्वर पवार पर्यवेक्षक मा.वि.थेरगाव, मंदार दीक्षित स्पोर्ट इंडि, कालिदास लांडगे कुस्ती कोच, विकास आडागळे मैदानी कोच, सचिन जाधव व कमलेश गोरे यांचे उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
सुप्रिया बडवे मॅडम यांचे शुभहस्ते श्री ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले तर मैदानाचे पूजन दत्ता झिंजुर्डे यांच्या शुभहस्ते झाले. माध्यमिक विद्यालय थेरगाव च्या व कबड्डी खेळाडू दत्तक योजनेतील राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा यथोचित सत्कार श्रीमती सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त क्रीडा, सुप्रिया बडवे मॅडम व रज्जाक पानसरे क्रीडा अधिकारी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते झाला. खेळाडूंच्या मनोगता नंतर दत्ताजी झिंजुर्डे यांनी, ‘”कोरोना महामारी मुळे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे फार मोठे नुकसान झाले आहे. खेळाडू मुलांची वय वाढले आहेत. स्पर्धेच्या जन्मतारखा आणि वय वाढवणे विषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना 21/ 9 /2021ला होणाऱ्या राज्य कबड्डी संघटनेच्या मीटिंगमध्ये सुचविणार आहे” असे सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कबड्डी खेळाडू दत्तक योजनेच्या मुलींच्या प्रशिक्षण केंद्राचे अनौपचारिक उद्घाटन श्रीमती सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त क्रीडा यांनी केले. आपल्या भाषणातून उदाहरणासह खेळाचे महत्व पटवून सांगत पोलीस भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदर खेळाडूंना मार्गदर्शन मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. थेरगावच्या मैदानावर क्रीडाविषयक उत्तम काम चालत असून” क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका” या महिला कबड्डीच्या संघाचे व्यवसायिक संघात रूपांतर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . थेरगाव शाळेतील कबड्डी मॅट, सेमिनार हॉल, शाळेला मिळालेली पारितोषिके या सर्व बाबींची पहाणी करून शाळेच्या कामकाजाचे कौतुक करत पुढेही लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले.
“खेळात उत्तम यश मिळविण्यासाठी एक उत्तम खेळाडू, उत्तम डायट टेशन ,न्यूट्रिशन ,फिजिओथेरपिस्ट ,स्पोर्ट्स मेडिसिन आणि उत्तम प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. प्रो कबड्डी व आयपीएल मुळे खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे स्पोर्ट्स जनरालिझम, स्पोर्ट्स मीडिया उत्तम उत्तम काम करत आहे. अशाप्रकारे स्पोर्टस इकोसिस्टीम वाढीस लागत असल्याने पुढच्या काळात अशा प्रयत्नाच्या जोरावर आपण सात पदके ही ऑलिंपिक मधील सिंगल डिजिट संख्या डबल डिजिट करूयात!”असे आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती सुप्रिया बडवे मॅडम यांनी खेळातून कसे करिअर बनते हे स्पष्ट करून. थेर गावातील खेळाडूंसह क्रीडा प्रशिक्षक श्री बन्सी आटवे यांचे कामाचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पवार पर्यवेक्षक व आभार रज्जाक पानसरे साहेब क्रीडाधिकारी,नियोजन श्री चंद्रशेखर कदम मुख्याध्यापक, प्रास्ताविक बन्सी आटवे यांनी केले. सुप्रिया बडवे मॅडम यांचे वतीने खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला .