शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
काही मंडळी पोस्टरबाजीसाठी बॅनर लावण्यासाठी सरासपणे झाडांचा वापर करतात या जाहिरातबाजीमुळे असंख्य ठिकाणी खिळे ठोकलेले हे वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. झाडांच्या या निशब्द वेदना ओळखून यमुनानगर येथील माणुसकी फाऊंडेशन (पिं.चिं.शहर) च्या तरुण/तरुणींनी त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम सुरू केले आहे.
‘पेन फ्री ट्री’ अर्थात ‘वेदनामुक्त झाड’ या नावाने सुरू झालेल्या उपक्रमामुळे अनेक झाडांना ‘पालवी’ फुटणार आहे यमुनानगर निगडी येथील सुवर्णयुग चौकातून या अभियानाला सुरुवात झाली.माणुसकी फाऊंडेशनचा टीमने यमुनानगर परिसरातील तब्बल २०० पेक्षा जास्त झाडांवरील खिळे,तार व जाहिरात फलक काढून या झाडांना वेदनामुक्त केल.या ठोकलेल्या खिळे व तार काही कालांतराने गंजतात.तो गंज झाडांच्या बुंध्यात उतरतो. परिणामी झाडावर हाळुहाळू परिणाम होतो आणि झाड खंगत जाते.व जोरदार पाऊसात झाडांच्या या फांद्या तुटून पडतात व नुकसान करतात. म्हणुन ‘झाडे वाचवा जीवन वाचवा’.