शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
राधाकृष्ण इंटरनॅशनल संस्थेतर्फे नुकतेच पहिले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेमकाव्य संमेलन घेण्यात आले. विश्वविख्यात कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षस्थानी होते.या आंतरराष्ट्रीय प्रेमकाव्य संमेलनाचे
औचित्य साधून वर्ल्ड पोएट्री,पॅरिस संस्थेने, डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना इंटरनॅशनल मिलेनियम ॲवाॅर्ड फाॅर लव्ह पोएट्री.2021 प्रदान करण्यात आला.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी हायकू,गीत,बालकाव्य,मुक्तछंद, हास्य काव्य,ग्रामीण काव्य, चारोळी, गझल
अशा विविध पातळीवर जवळजवळ 50 वर्ष आशयघन प्रेम कविता लिहून स्वतःचे एक युग निर्माण केले, त्यात प्रायोगिकता आणली तसेच सर्वाधिक काव्यसंग्रहाच्या विश्वविक्रमाचे मानकरीही ठरले..या यशस्वी
वाटचालीस त्यांच्या प्रतिभेला मानाचा मुजरा म्हणून सदर गौरव करण्यात आल्याचे,वर्ल्ड पोएट्री संस्थेच्या समन्वयक चित्रा गांगुली यांनी कळवले आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री – गायिका-वर्षा हळबे(USA), सुप्रसिद्ध अभिनेत्री-कवयित्री-गायिका गीतांजली जेधे(महाराष्ट्र), मुख्य निमंत्रक डाॅ.योगेश जोशी(मुंबई), सहनिमंत्रक सायली कुलकर्णी (कॅनडा), प्रतिमा काळे(पुणे) तसेच प्रसिद्ध कवयित्री मंजिरी जोशी( USA), डाॅ.मानसी मोहरिल (नेदरलॅंड),ॲड. सुनिता पागे (पुणे) आदि मान्यवर उपस्थित होते.