शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पर्यावरण तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, १६ राज्य तसेच भारत देशाबाहेर इतर ११ देशात यशस्वीपणे स्थापना करून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान देवा तांबे,राष्ट्रीय सचिव श्रीमान दिपकजी काळे,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती अंजू सोनवणे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.
याप्रसंगी पुणे जिल्हा शाखेच्या उपाध्यक्षा सौ.विद्या पेनसलवार,सौ.अनघा दिवाकर,सचिव सौ.कल्पना तळेकर,सहसचिव सौ.मीनाक्षी मेरुकर,निरीक्षक सौ.वैशाली खराडे,समन्वयक सरस्वती भेगडे,संघटक सौ.शारदा सस्ते,सल्लागार श्रीमती मनीषा कलशेट्टी,प्रसिद्धीप्रमुख सौ.शहनाज हेबाळकर,माहिती व जनसंपर्क प्रमुख सौ.साधना दातीर,मार्गदर्शक सुरेखा भामरे, तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारिणी सदस्या सौ.अंजली ब्रह्मे,श्रीमती प्रतिमा काळे,सौ.रोहिणी जोशी,सौ.वंदना कोरपे,सौ शुभांगी जाधव,सौ.प्रमिला आबनावे,सौ.सविता कोरड,सौ.मानसी कपोले,सौ.मुनोत,सौ.वंदना सावंत, श्री.राकेशजी सायकर,श्री.सुभाषजी मालुसरे,श्री.धनंजयजी कुलकर्णी,श्री.सतीशजी भारती,श्री.आमनजी सय्यद,श्री.भारतजी बेदमुथा,श्री.सुहासजी सावकार व संस्थेचे मार्गदर्शक श्री.अनिलजी दिवाकर,सल्लागार श्री.अशोक पांढरकर यांची सन्मानपूर्वक नियुक्ती करून त्यांना संस्थेचे आयकार्ड,नियुक्ती पत्र व पदांचे वाटप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान देवा तांबे सर व सचिव श्रीमान दीपक काळे सर यांच्या हस्ते करून पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ही संस्था महावृक्षारोपन,ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारणी मोहीम,महिला सक्षमीकरण,रक्तदान,गोशाळाइत्यादि २० पेक्षाही अधिक मुद्दे घेऊन स्वखर्चाने कार्यरत असून,यावेळी उपस्थित पदाधिकारी,सदस्य यांना गाव तेथे गोशाळा या संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. आपले आरोग्य आपल्या हाती व पुढील पिढीच्या भवितव्याबाबत आजच काळजी घेणे,यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संगोपन काळाची गरज, संस्थेच्या माध्यमातून महिलांना व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी लवकरच संस्थेच्या पुणे जिल्हा शाखेच्या माध्यमातून दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्षा श्रीमती अंजू सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने संस्थेला ग्वाही दिली.