शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी मध्ये एका 16 वर्षीय मुलीचा पीएमपीएलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली.
पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी मध्ये भाजी आणण्यासाठी सायकल वरून जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या सायकल ला पीएमपीएलच्या बसणे पाठीमागून जोरात धडक दिल्याने या मुलीचा जागीच मृत्यू झाला.
पुणे : शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी मध्ये भाजी आणण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीचा पीएमपीएमएलच्या धडकेत अपघाती मृत्यू सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे घटना pic.twitter.com/UEh7o7SmE8
— SHABNAM NEWS (@ShabnamNews) August 31, 2021
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी मधील एका सोसायटीत सुरेश रुद्र परिहार हे वॉचमन म्हणून काम करतात. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या 16 वर्षाच्या चंदा नावाच्या मुलीला भाजी आणण्यासाठी सांगितले. चंदा सायकलवरुन भाजी आणण्यासाठी गेली असता, रस्त्यावरून जात असताना मॉडेल कॉलनीतील डीएसके चौक येथे पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएल बसने तिच्या सायकल ला जोरात धडक दिली. धडक बसल्याने चंदा बाजूला रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर तिला खाजगी आणि तेथून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीएमपीएल चालक नंदकुमार नंदकर याला अटक करण्यात आले असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.