शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
चालू आठवड्याच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचं कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. गुरुवारी एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
शुक्रवारी उशीरा शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. पण शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पुणेकरांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग, वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एस एन डी टी /वारजे जलकेंद्र, नवीन होळकर भामा आसखेड, चिखली रावेत पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत.