शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
वर्ल्ड पीस मल्टी पर्पज असिस्टंटस् ऑर्गनायझेशन इंडिया श्री साई फौंडेशन पुणे संस्थांनी नुकताच ख्यातनाम व्यंगचित्रकार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा International Cartoonist Lifetime Achievement Award.2021 ऑनलाईन प्रदान करुन सन्मानित केले आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना एकपात्री कला कविता,अभिनय, गायन, शीळवादन, लघुपट, ग्रॅफाॅलॉजि,ज्योतिष, ब्रम्हध्यान, वास्तुशास्त्र, रेकी,संमोहन, संपादन,पर्यावरण, सामाजिक क्षेत्र आदि विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर 200 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 250 विश्व विक्रम त्यांच्या नावावर आहेत. 225पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संस्थापक, अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ चौधरी यांच्या शुभहस्ते सदर ऑनलाईन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ” नभांगणात ‘सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा ‘ चमकत आहे. कितीही शकं-युगं-संवत्सरं उलटली तरी असेअन्य व्यक्तिमत्व पहायला मिळणे दुर्मीळच ठरेल ” असे गौरवोद्गार अक्षरआनंद इंटरनॅशनल.चे संस्थापक.अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी यांनी काढले. राधाकृष्ण इंटरनॅशनल.च्या सहनिमंत्रक प्रतिमा यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर गेली 3 दशकं व्यंगचित्राच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.