शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
कोथरूड | प्रतिनिधी
कोथरूड आगारामध्ये पंचशील ग्रुप च्या वतीने मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. डेपो मॅनेजर कदम साहेब यांनी पीएमपीएल च्या वतीने जागतिक बँकेसोबत डिझेल बचतीच्या उपक्रमामध्ये समन्वयक म्हणुन अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यामुळे संस्थेला सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळाला त्यामुळे त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोथरूड आगारामध्ये पंचशील ग्रुपने दिली आहे.
तसेच यावेळी नवनियुक्त असिस्टंट डेपो मॅनेजर राजेश जाधव साहेब यांनी कोथरूड आगारांमध्ये पदभार स्वीकारला. त्याबद्दल त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. व तसेच डेपोतील लेखनिक नखाते यांचा वाढदिवसअसल्याने त्यांचा पण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. डेपोतील कायम चालक कैलास माने यांची कन्या कल्याणी कैलास मेमाने ही बीकॉम पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच महामंडळा मधून सेवानिवृत्त झालेले किशोर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कोथरुड आगारामधील सिनिअर लेख निकाल बांदल साहेब , सुनील शिंदे सर ,डामसे साहेब, किशोर शिंदे, मेमाने ,गॅरेज सुपरवायझर माने साहेब, वाघोले साहेब टाईम किपर प्रताप साहेब ,टाईम किपर कुटाळे साहेब, डेपोतील कामगार तसेच पंचशिल ग्रुप चे अध्यक्ष नागेश भाऊ गायकवाड, उपाध्यक्ष दीपक भाऊ लोंढे, सेक्रेटरी गणेश भाऊ कदम ,खजिनदार सुभाष दादा पवार ,तसेच डेपोतील कामगार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पंचशील ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विलास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलं होतं.