शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्राधिकरणाच्या जागेवर अनेक वर्षापासून घर बांधून राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर संबंधित जागा करावी, अशी मागणी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
Advertisement
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला प्राधिकरणाच्या जागेवर राहणारे नागरिक हे वर्षानुवर्षे प्रत्येक प्रकारचा कर देत आले आहे. प्राधिकरणाच्या जागेत राहणारे हे नागरिक त्यांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करावा, अशी मागणी रवी लांडगे यांनी केली आहे.
Advertisement
प्राधिकरणाच्या जागेचा प्रश्न हा पिंपरी-चिंचवडचे शिल्पकाराच्या हातानेच मार्गी लागू शकतो, असा विश्वास नगरसेवक रवी लांडगे यांनी व्यक्त केला आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक रवि लांडगे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Advertisement
Advertisement