शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार, लेखक आणि इतिहास संशोधक तर होतेच शिवाय पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन, सारथी तसेच लोकहितवादी या नियतकालींकामधून सामाजिक न्यायाबाबत जनजागृतीचा यशस्वी प्रचार केला असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केशव सिताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांचे प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त अजय चारठणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या प्रबोधनकार ठाकरे हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वामुळे प्रसिध्द होते तसेच ते पत्रकार, नाटककार, इतिहासकार, संगीतकार, सुधारणावादी आणि सामाजिक न्यायासाठी लढणारे निर्भिड नेते होते असे सांगून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत त्यांनी केलेले भरीव कार्य कायम स्मरणात राहील असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.