शबनम न्यूज | सातारा
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर त्यांनी हसन मुश्रीफांना ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केलीय. सोमय्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सोबतच जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना किरीट सोमय्यांनी ‘चॅलेंज’ केले आहे. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. मुश्रीफांविरोधात आणखी एक घोटाळा उघडकीस आणू, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते कोल्हापूरला येत असतानाच, कऱ्हाडमध्ये त्यांना पोलिसांनी उतरवलं. कोल्हापूरला जात असताना तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना कऱ्हाडात पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमय्या यांनी कऱ्हाडात आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांसह शरद पवार, अजित पवार व ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.