शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी जावेद शेख यांनी आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला,
हाजी जावेद शेख हे चिंचवड विधानसभा मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या वतीने राबविले जात आहेत
मागील विधानसभा निवडणूक प्रसंगी ते चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार होते त्यांनी तशी पूर्ण तयारी केली होती परंतु त्यांना काही कारणामुळे निवडणूक लढविता आली नाही
सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम हाजी जावेद शेख हे करीत आले आहेत त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नक्कीच काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जावेद शेख यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेशाने काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहरात आणखीन मजबूत होईल अशी चर्चा आहे.
पक्ष प्रवेशाच्या वेळेस त्यांचे सोबत काँग्रेसचे मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव ,विशाल कसबे अन्य काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते