शबनम न्यूज : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांना मिळणारं मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया दिली.
बच्चू कडू म्हणाले, “खातेवाटपामध्ये अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला, तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. तसं पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.”“प्रत्येक आमदाराला असं वाटतं आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये,” असा दावा बच्चू कडूंनी केला
Advertisement