शबनम न्यूज : प्रतिनिधी
पुणे :चाकण – शिक्रापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात कारचालक आणि कारमधील सहप्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य धर्मा मेमाने (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड) व अमोल व्यंकटराव लोमटे (वय ३२) चाकण – शिक्रापूर रोडने कारमधून (एमएच १४ जेयु ४२४८) जात होते. आदित्यने कार वेगात चालवून समोरील कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात आदित्य आणि अमोल यांचा मृत्यू झाला.